औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.
Showing posts with label marathas. Show all posts
Showing posts with label marathas. Show all posts
Saturday, 27 August 2016
Panipat War 1
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.
panipat war
पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.
Labels:
bajorao peshwa,
marathas,
panipat war,
peshwas,
pune,
पानिपत
shahu mahraj bhosle
छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ,पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे,रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले.
narayanrao peshwa
डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खूनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा देऊन नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली. खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करायचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुन: पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणिसांनी इंग्रजांची २-३ राजकीय व लष्करी आक्रमणे परतवून लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले.
Nana Fadanavis
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात मार्च १३, इ.स. १८०० रोजी त्यांचा अंत झाला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.
Labels:
ellora,
forts,
hindu,
kokan,
kulaba fort,
lonaval,
maharashtra,
maharashtra forts,
maharashtra history,
maharashtra tourism,
maharashtra turisam,
marathas,
marathi,
marathi lonavala,
nana fadnavis,
peshwas
Location:
Pune, Maharashtra, India
Tuesday, 8 September 2015
किल्ले कुलाबा !!!!!!!!
![]() |
| kulaba fort |
अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो.
इतिहास :
१९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला
किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहेकिल्ल्याला १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. १७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे.
दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्या आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून - पनवेल - वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.
Labels:
forts,
kulaba fort,
maharashtra,
maharashtra forts,
maharashtra frts,
maharashtra tourism,
maharashtra turisam,
maratha,
marathas,
marathi,
marathi lonavala,
shivaji maharaj,
talwar,
verul
Tuesday, 30 June 2015
वेरूळ लेणी part1
वेरूळ
एक पुरातत्व साइट 29 किमी (18 मैल) शहर उत्तर-पश्चिम आहे औरंगाबाद मध्ये भारतीय राज्यया महाराष्ट्र बांधले राष्ट्रकूट राजवंश . तसेच राष्ट्रकूट मध्ये Elapura म्हणून ओळखले जाते कन्नड साहित्य. पण त्याच्या अत्यंत महत्वाचा लेणी प्रसिध्द, वेरूळ एक आहे जागतिक वारसा . वेरूळ च्या योजना प्रतिनिधित्व भारतीय रॉक-कट आर्किटेक्चर . 34 "लेणी" प्रत्यक्षात Charanandri टेकड्या उभ्या चेहरा बाहेर उत्खनन संरचना आहेत. बौद्ध , हिंदू आणि जैन रॉक-कट मंदिरे आणि उद्देश आणि फायदे याबद्दल माहिती 5 व्या शतकात व 10 व्या शतकातील दरम्यान बांधण्यात आली होती. शेजारी मध्ये बांधले 12 बौद्ध (1-12 लेणी), 17 हिंदू (लेणी 13-29) आणि 5 जैन (लेणी 30-34) लेणी, या काळात प्रचलित धार्मिक सुसंवाद ठेवावी भारतीय इतिहास . तो आहे अंतर्गत संरक्षित स्मारक भारत पुराणवस्तुसंशोधन सर्वेक्षण .
एक पुरातत्व साइट 29 किमी (18 मैल) शहर उत्तर-पश्चिम आहे औरंगाबाद मध्ये भारतीय राज्यया महाराष्ट्र बांधले राष्ट्रकूट राजवंश . तसेच राष्ट्रकूट मध्ये Elapura म्हणून ओळखले जाते कन्नड साहित्य. पण त्याच्या अत्यंत महत्वाचा लेणी प्रसिध्द, वेरूळ एक आहे जागतिक वारसा . वेरूळ च्या योजना प्रतिनिधित्व भारतीय रॉक-कट आर्किटेक्चर . 34 "लेणी" प्रत्यक्षात Charanandri टेकड्या उभ्या चेहरा बाहेर उत्खनन संरचना आहेत. बौद्ध , हिंदू आणि जैन रॉक-कट मंदिरे आणि उद्देश आणि फायदे याबद्दल माहिती 5 व्या शतकात व 10 व्या शतकातील दरम्यान बांधण्यात आली होती. शेजारी मध्ये बांधले 12 बौद्ध (1-12 लेणी), 17 हिंदू (लेणी 13-29) आणि 5 जैन (लेणी 30-34) लेणी, या काळात प्रचलित धार्मिक सुसंवाद ठेवावी भारतीय इतिहास . तो आहे अंतर्गत संरक्षित स्मारक भारत पुराणवस्तुसंशोधन सर्वेक्षण .
इतिहास
वेरूळ हिंदू, बौद्ध व जैन (6 9 शतके) दरम्यान बांधले गुहेत मंदिरे नियम प्रसिध्द आहे Kalachuri , चालुक्य आणि राष्ट्रकूट राजघराणी. जगन्नाथ सभा बांधलेले 9 व्या शतकाच्या पाच जैन मंदिरे गुहेत एक गटराष्ट्रकूट
बौद्ध लेणी
या गुंफा व लेणी 5 व्या 7 शतक दरम्यान बांधण्यात आली होती. सुरुवातीला बौद्ध लेणी नंतर टप्प्यात पहिल्या टप्प्यात (400-600) आणि 6-12 मध्ये लेणी 1-5 (7 चेंडू-चेंडू सह, पाचव्या आणि आठव्या शतके दरम्यान तयार लवकरात लवकर संरचना एक होते असे मानले गेले 8), पण आता तो हिंदू लेणी (27,29,21,28,19,26,20,17 आणि 14) काही या लेणी महत्व की आधुनिक अभ्यासक स्पष्ट आहे. लवकरात लवकर बौद्ध लेणी आहे 5,2,3,5 (उजवीकडे विंग) त्यानंतर गुहा 6, 4,7,8,10 आणि 9 गुंफा 11 व 12 होती. सर्व बौद्ध लेणी 630-700 दरम्यान बांधण्यात आले. या संरचना मुख्यतः समावेश उद्देश किंवा मठ: जिवंत मात्रेत, झोपेत मात्रेत, स्वयंपाकघर, आणि इतर खोल्या समावेश डोंगरावर चेहरा मध्ये कोरलेली मोठी, मल्टि-मजली इमारती,. या मठ लेणी काही कोरीव काम समावेश अशेरा देवीचे स्तंभ आहे गौतम बुद्ध , bodhis आणि संत. या लेणी अनेक मध्ये, शिल्पकारांचा दगड लाकूड स्वरूप देईल तयारीला लागलो आहे.
बौद्ध लेणी सर्वात प्रसिद्ध गुहेत 10, एक (नकाशा पहा) आहे चैत्यगृह हॉल ( chandrashala लोकप्रिय 'त्या सुताराचा गुहा' म्हणून ओळखले जाते) किंवा 'Vishvakarma गुहेत'. त्याच्या बहु-मजली नोंद पलीकडे ज्या मर्यादा लाकडी तुळ्या ठसा देण्यासाठी खोदलेले आहेत तसेच ते चैत्यगृह म्हणून ओळखले कॅथेड्रल सारखी ठाणाळे लेणी, हॉल आहे. या गुहेत हृदय ठरू एक प्रचार बसला बुद्ध एक 15 फूट मूर्ती आहे. इतर बौद्ध लेणी मिळून, पहिल्या नऊ (लेणी 1-9) सर्व मठ आहेत.गेल्या दोन लेणी, दो ता (गुहेत 11) आणि कथील ता (गुहेत 12) तीन कथा आहेत
गुहा 10
गुहा 10 आठ पेशी, योग्य त्या भिंतीला परत भिंत चार आणि चार एक vihara आहे. तो एक सेल सह समोर एक पुष्कळ खांब असलेले द्वारमंडप होता. शक्यतो इतर जातककथा एक धान्याचे कोठार म्हणून सेवा केली.
विश्वकर्मा
विश्वकर्मा (गुहा 10) फक्त आहे चैत्यगृह गृह लेणी बौद्ध गट मिळून. स्थानिक विश्वकर्मा "स्वर्गीय शिल्पकार" किंवा सुतार का jhopda "सुताराचा झोपडी" म्हणून ओळखले जाते. हे लेणी 19 बांधकाम आणि 26 नमुना खालील अजिंठा . Stylistic कारणास्तव, या गुहेत बांधकाम तारीख चैत्यगृह एकदा सध्या उद्ध्वस्त आहे एक उच्च स्क्रीन भिंत होती 700 ए नियुक्त केले आहे. समोर वेळी पायऱ्या उड्डाण माध्यमातून प्रवेश केला आहे जे एक रॉक-कट न्यायालयाने आहे. पहिल्या मजल्यावर, एकतर बाजूला त्यांच्या मागे भिंतीवर चेंबर्स सह स्तंभ porticos आहेत. या कदाचित उपकंपनी अशेरा देवीचे स्तंभ आहेत हेतू पण पूर्ण झाली नाही.चैत्यगृह च्या स्तंभ व्हरांड्यात शेवट आणि परत भिंत आतापर्यंत ओवरनंतर एका सेल एकतर एक लहान पवित्र जागा आहे. मार्गिका स्तंभ भव्य squarish shafts आणि ghata-पल्लव (फुलदाणी आणि झाडाची पाने) राजधानी आहे. मुख्य हॉल योजना apsidal आहे आणि साधा कंसात अक्षरात 28 अष्टकोनी स्तंभ मध्यवर्ती नवे आणि बाजूला aisles विभागलेला आहे. चैत्यगृह हॉल apsidal शेवटी कोरलेली आहे एक प्रचंड 3.30 मीटर उंचvyakhyana मुद्रा (शिक्षण पवित्रा) बुद्ध बसलेले जे चेहरा ठाणाळे लेणी, आहे. मोठ्या Bodhi झाड मागे कोरलेली आहे. हॉल ribs (triforium म्हणून ओळखले जाते) खडकात कोरलेली आहेत ज्यात एक घुमटकार आढे असणारा छप्पर आहे लाकडी विषयावर अनुकरण . खांब वरील friezes मनोरंजन नृत्य म्हणून नागा राण्या, पावसाळा प्रतिकात्मक, तसेच dwarfs आहेत आणि वाद्य वादन.
हिंदू लेणी
हिंदू लेणी आठव्या शतकाच्या शेवटी सोळाव्या शतकामध्ये दरम्यान बांधण्यात आले. लवकर लेणी (17-29 लेणी) दरम्यान बांधण्यात आले Kalachuri काळात. पहिल्या लेणी 28, 27 आणि 19. मध्ये सुरू काम या दोन सर्वात प्रभावी लवकर टप्प्यात बांधण्यात लेणी करण्यात आली होती - गुंफा 29 आणि या दोन सोबत 21, काम गुंफा 20 आणि 26 येथे चालू होते, आणि किंचित नंतर लेणी येथे 17, 19 व 28 लेणी 14, 15 व 16 दरम्यान बांधण्यात आले राष्ट्रकूट काळात. काम गुंफा 14 आणि 15 मध्ये सुरुवात केली आणि गुहा 16 मध्ये आली या सर्व संरचना सर्जनशील दृष्टी आणि अंमलबजावणी कौशल्य एक भिन्न प्रकारच्या प्रतिनिधित्व. काही पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि समन्वयाची अनेक पिढ्या आवश्यक अशा गुंतागुंती होते.
Kailasanatha मंदिर
मुख्य लेख: कैलास मंदिर, वेरुळ
म्हणून ओळखले गुहा 16, कैलास मंदिर , वेरूळ च्या अद्वितीय केंद्रस्थानी आहे. या आठवण्याचा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे माउंट कैलाश , परमेश्वराच्या राहिला शिव - एक कसलाही आधार न घेता उभा असलेला, मल्टि-मजली मंदिरात दिसते, पण तो एकाच खडकातून निर्माण करण्यात आला, आणि त्या क्षेत्रात आकार दुप्पट कव्हर पार्थेनन मध्ये अथेन्स . सुरुवातीला मंदिर हिमाच्छादित पर्वतावर कैलास करण्यासाठी सारखेपणा वाढत अशा प्रकारे आणखी पांढरा मलम सह झाकलेले होते.
सर्व कोरीव काम एकापेक्षा अधिक पातळी केले आहेत. एक दक्षिण भारतीय सदृश एक दोन मजली गेटवे Gopura यू-आकार अंगणाच्या प्रकट उघडते. अंगणात तीन storeys उच्च columned गॅलरी करून झेल आहे. गॅलरी देवतांचे विविध प्रचंड शिल्पे असलेले प्रचंड कोरीव पटल आणि alcoves करून punctuated आहेत. मूलतः केंद्रीय मंदिर संरचना या गॅलरी कनेक्ट दगडी पूल उड्डाण करणारे हवाई परिवहन, पण या मृत्यू पावल्या आहेत.
अंगणात आत तीन संरचना आहेत. शिव मंदिरात पारंपारिक आहे, पहिल्या पवित्र वळू मोठ्या प्रतिमा आहे नंदी मध्य मंदिराच्या समोर. केंद्रीय मंदिर - नंदी Mantapa किंवा Mandapa - Lingam घरे.नंदी Mandapa 16 खांब वर स्टॅण्ड आणि 29.3 मीटर जास्त आहे. नंदी Mandapa पाया व्यक्ती हत्ती उंच संरचना असणारी आहेत असे सूचित खोदलेले आहेत. एक जिवंत खडक पूल ते मागे शिव मंदिर नंदी Mandapa कनेक्ट. मंदिर स्वतः ची आठवण करून देणारा एक उंच शंकूच्या आकाराचे रचना आहे दक्षिण भारतीय द्रविड मंदिर. पवित्र जागा - खांब, खिडक्या, आतील आणि बाहेरील खोल्या गोळा हॉलमध्ये, आणि त्याच्या हृदय एक प्रचंड lingam पूर्ण - दगड जिवंत पासून कोरलेली, (niches, pilasters, विंडो तसेच देवतांचे प्रतिमा, mithuna सह कोरलेली आहे कामुक नर आणि मादी आकडेवारी) आणि इतर आकडेवारी. प्रवेशद्वार डाव्या येथे देवतांचे सर्वात Shaivaite उजव्या बाजूला असलेल्या देवता आहेत, तर (शिव अनुकरण) Vaishnavaites (विष्णू अनुयायी). अंगणात दोन Dhvajastambhas (फ्लॅगस्टाफ सह खांब) आहेत. भव्य शिल्पकला रावण संपूर्ण ताकदीने, माउंट कैलास भगवान शंकराचे राहिला लिफ्ट प्रयत्न भारतीय कला एक प्रमुख आहे. या गुहेत बांधकाम मानवी अलौकिक बुद्धिमत्ता एक पराक्रम होता - ते रॉक 200.000 टन काढण्याची सामोरे जावे लागले, आणि पूर्ण करण्यासाठी 100 वर्षे लागली. मंदिर राष्ट्रकूट Karnata आर्किटेक्चर एक भव्य यश आहे. हा प्रकल्प कृष्णा मी (757-773) सुरू करण्यात आली राष्ट्रकूट राज्य की राजवंश Manyakheta उपस्थित दिवशी कर्नाटकराज्य. त्याच्या नियम देखील दक्षिण भारतातील पसरला होता, त्यामुळे या मंदिरात प्रचलित शैली मध्ये घेण्यात आलेले होते. त्याची बांधणाऱ्यांनी मध्ये Virupaksha मंदिर धर्तीवर मागच्या पायांचे प्रतिरूप असलेले Pattadakal . दक्षिण भारतातील एका प्रकारचा मंदिर असल्याने, तो उत्तर भारतीय मंदिर सामान्य shikhara नाही. - भारतीय उपखंडासाठंी,1996, Takeo Kamiya, जपान उंचीच्या अकादमी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्किटेक्चर गाइड
दशावतार
दशावतार (गुहा 15) बौद्ध मठ म्हणून सुरु होते. हे मध्यम येथे मोफत उभा monolithic mandapa आणि मागील एक दोन मजली उत्खनन मंदिर खुले न्यायालय आहे. मंदिराच्या लेआउट लक्षपूर्वक लेणी 11 वरील मजल्यावर भिंत स्तंभ दरम्यान 12 मोठ्या शिल्पासारखे पटल संबंधित आहे दहा समावेश जे थीम, विस्तृत स्पष्ट अवतार विष्णू आहे. देऊ एक अक्षर Dantidurga समोर mandapa परत भिंतीवर आढळले आहे.कुमारस्वामी मते, या गुहेत लागणा मदत विष्णू मनुष्य-सिंह (जेथे Hiranyakashipu, मृत्यू दर्शवणारी एक आहे नरसिंह ) फॉर्म, Hiranyakashipu च्या खांद्यावर एक जीवघेणा हात बसविणे एक स्तंभ पासून emerges.
इतर हिंदू लेणी
इतर लक्षणीय हिंदुधर्मीय लेणी नदीच्या देवी च्या figurines आहे Rameshvara (गुहा 21), आहेत गंगा आणि यमुना प्रवेशद्वार आणि ज्या रचना गुहेत मंदिर समान आहे Dhumar Lena (गुहा 29) एलिफंटा बेट मुंबई जवळ. इतर दोन लेणी, 'रावण की Khai (गुहा 14) आणि Nilkantha (गुहा 22) देखील अनेक शिल्पे आहेत.Kumbharvada (गुहा 25) आणि Gopilena (गुहा 27) यांचा समावेश आहे हिंदू लेणी, उर्वरित नाही लक्षणीय शिल्पे आहेत.
Monday, 29 June 2015
किल्ले सज्जनगड, सातारा (marathi)
किल्ले सज्जनगड, सातारा
किल्ल्याची उंची:- ३३५० फूट
किल्ल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
डोंगररांगः- सातारा
जिल्हा :- सातारा
श्रेणी:- मध्यम
किल्ल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
डोंगररांगः- सातारा
जिल्हा :- सातारा
श्रेणी:- मध्यम
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी. अनंत कवींनी या पावन भूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे.
सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोर्यात हा दुर्ग उभा आहे.
इतिहास:-
प्राचीन काळी या डोंगरावर आश्र्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला 'आश्र्वलायनगड' म्हणू लागले. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधीले जायचे. चौथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८-१३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २एप्रिल इ.स.१६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून धेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगङ. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. पुढे ३-११-१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३-१२-१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांनी समाधी घेतली. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला. ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २६-१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोजी काटकर हयाला पत्र लिहले की ''श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती......ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात,तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून केलो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे.उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती दीवाकर गोसावी यांचे ईमाने आम्हास श्रुत होऊन होणे तो होईल.....या उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे... या पत्रा प्रमाणे राहाटी करणे.'' या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नौरससातारा' म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-
गडावर शिरतांना लागणार्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार' असे म्हणतात. हे द्वार आग्रेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसर्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो.
ज्या पायर्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायर्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावी कडे वळावे.
घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरा समोरच ध्वजस्तंभ आहे. नंतर आल्यामार्गाने पुन्हा तळयापाशी यावे व सरळ पुढे चालत जावे.वाटेतच उपहारगृह,श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा लागतात. धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात.तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका आहे. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणारी वाट पकडावी आणि आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचं मंदिर आहे तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर,समर्थांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून झाले की मंदिराच्या पुढच्या द्वारातून बाहेर पडायचे आणि डावीकडे वळावे. प्रथम 'ब्रम्हपिसा' मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे.येथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो.गड फिरण्यास दोन तास पुरतात.
ज्या पायर्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायर्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावी कडे वळावे.
घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरा समोरच ध्वजस्तंभ आहे. नंतर आल्यामार्गाने पुन्हा तळयापाशी यावे व सरळ पुढे चालत जावे.वाटेतच उपहारगृह,श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा लागतात. धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात.तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका आहे. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणारी वाट पकडावी आणि आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचं मंदिर आहे तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर,समर्थांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून झाले की मंदिराच्या पुढच्या द्वारातून बाहेर पडायचे आणि डावीकडे वळावे. प्रथम 'ब्रम्हपिसा' मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे.येथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो.गड फिरण्यास दोन तास पुरतात.
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायर्या आहेत. साधारण ७८० पायर्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो
गडावरून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश:-
अजिंक्यतारा
सातारा शहराचे दृश्य.
चाफळ चे राममंदिर ई
अजिंक्यतारा
सातारा शहराचे दृश्य.
चाफळ चे राममंदिर ई
जय भवानी..जय शिवाजी..!!
MarathiKing.In
Subscribe to:
Posts (Atom)








