खंडा आणि त्याचे प्रकार:
खंड (करणे) म्हणजे विभागणे, तोडणे किंवा कापून २ तुकडे करणे. खंडा म्हणजे २ किंवा तुकडे करून खांडोळी करण्याचे शस्त्र. खंडाचे अनेक प्रकार आहेत
खंडा: प्राचीन काळी खंडा खूपच जड आणि रुंद पातीचा असे. त्याला करवती सारखे त्रिकोणी दात असत. पण वागवण्यास खूपच जड आणि बाळगण्यास जिकरीचे असे. त्याकाळी, याला खड्ग म्हणत असत. गुप्त साम्राज्याच्या काळात शश्त्रांमध्ये खूप सुधारणा घडून ति पेलण्यास व बाळगण्यास सोपी अशी जडण घडणीची तयार होऊ लागली.
किरच: खंडाचाच एक प्रकार पण पाती वजनाने हलकी आणि बाकदार. वजनाने कमी असल्याने फिरवण्यास अधिक सोपी. खंडा एक घाव दोन तुकडे करण्यास उपयुक्त असे तर किरच भोसकण्यासाठी. वजनाने हलकी असल्याने सामान्य अंगयष्टीचे सैनिकही तिला चालवू शकत असत.
सोसुनपट्टा: खंडाचा पहिला उपप्रकार. किरच पेक्षा अधिक रुंद आणि खंडाचीच कामगिरी, फक्त वजनाने नेहमीच्या खंडा पेक्षा कमी म्हणून घोड्यावरून लढताना फिरवण्यास सोपे. रेडे, हेले, बकरे बळी देण्याची पूर्वी प्रथा अधिक प्रमाणात होती तेव्हा रेडा, हेले आणि बकरे कापण्यास सोसुनपट्टा वापरला जाई कारण त्याची बाकदार पातीने मान छाटण्यास सोपे जाई.
खुकरी: सोसूनपट्ट्याचा छोटा आविष्कार जो खंजीर/ कटार प्रकारात मोडतो. शत्रूच्या माना छाटण्यासाठी उपयुक्त.
सदर खंडा राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे संग्रहात आहे.
No comments:
Post a Comment