'स्वयंभू श्री मार्लेश्वर देवस्थान' (संगमेश्वर, जि.रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. ह्या गुहेत दोन शिवपिंडी आहेत, त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर ह्या नावाने ओळखल्या जातात. असे सांगण्यात येते की, हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे स्थान निर्माण झाले तेव्हा येथे पार्वती नव्हती. आणि म्हणूनच ह्या देवस्थानाची अशी पद्धत आहे की येथे दर मकर संक्रांतीला शिव-पार्वतीचे लग्न लावले जाते. मार्लेश्वर हा वर तर साखरपा ह्या गावाची भवानी मंदिर (गिरिजादेवी) ही वधू समजून लग्न लावले जाते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. ह्या शिव पिंडी स्वयंभू आहेत.
गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. ह्या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.
मार्लेश्वरला जाण्यासाठी साखरपा, देवरुख तसेच रत्नागिरीहून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आहेत.
मार्लेश्वरला जाण्यासाठी साखरपा, देवरुख तसेच रत्नागिरीहून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आहेत.
No comments:
Post a Comment